Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाच्या आदेशावर बंदी घातली नाही तर काय होईल?, सिब्बल स्पष्टच बोललेत...

Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court Of India) निकालाच्या आधी निकाल दयायला नको होता. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर ....

Updated: Feb 21, 2023, 03:33 PM IST
Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाच्या आदेशावर बंदी घातली नाही तर काय होईल?, सिब्बल स्पष्टच बोललेत... title=

Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court Of India) निकालाच्या आधी निकाल दयायला नको होता. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर दरम्यानच्या काळात आमच्याकडून पक्षाचे निवडणूक चिन्ह, बँक खाते हिसकावून घेतले जाईल, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केल आहे. ( Maharashtra Politics ) 

 Thackeray vs  Shinde Updates : 'पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज'

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर उद्या सुनावणी घेण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाच्यावतीने वकील कपिल सिब्बल यांनी केली. त्यानंतर कोर्टाने उद्या सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. ठाकरे गटाच्या या अर्जावर उद्या दुपारी 3.30 वाजता सुनावणी करण्याचे आश्वासन सरन्यायाधीशांनी दिले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर दरम्यानच्या काळात आमच्याकडून पक्षाचे निवडणूक चिन्ह, बँक खाते हिसकावून घेतले जाईल, अशी गंभीरबाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

Political Crisis : विधिमंडळानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात

शिवसेना वादाच्या मूळ प्रकरणाशी संबंधित घटनात्मक तरतुदींवर आज घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाला उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्र अर्ज दाखल करुन आव्हान दिले आहे. खंडपीठ या अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी करेल. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी मात्र आक्षेप घेतला. कौल म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या आदेशाला उद्धव ठाकरे गटाने हायकोर्टात आव्हान द्यायला हवे होते. थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे कोणतेही औचित्य नाही.

 निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे - उद्धव ठाकरे

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. थेट निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची निवड ही योग्य पद्धतीने झालेली नाही. त्यांचा निर्णय हा लोकशाहीसाठी मारक आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता. 

Thackeray vs Shinde :  बंडखोरांवर कारवाई करण्याचा पक्षाला अधिकार!

माझं नाव आणि पक्षाचे चिन्हही चोरलेले आहे. चोराला राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरु झालाय. त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरलेलं आहे. हा पूर्वनियोजित कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव चोरु शकत नाही. बाळासाहेबांच्या आणि मासाहेबांच्या पोटी जन्माला येण्याचे भाग्य त्यांना दिल्लीवाले देऊ शकत नाही. आज त्यांनी जी परिस्थिती शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय ती देशातल्या कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच याचा मुकालबला केला नाही तर 2024 ची लोकसभेची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक ठरु शकेल. कारण त्याच्यानंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरु होऊ शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.