मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.  

Updated: Mar 19, 2021, 07:20 AM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर  title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळी साडेदहा वाजता ठाकरे हे सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगावच्या आरोग्य केंद्रांची पाहणी करणार आहेत. यादरम्यान ते कोरोना लसीकरण (Corona vaccination) संदर्भातली माहिती घेणार असून स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 

सुरवानी इथे सुरू असलेल्या वीज वितरण उपकेंद्राच्या कामाची पाहाणी देखील उद्धव ठाकरे यावेळी करणार आहेत. त्यानंतर धडगावमधल्या रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणसंदर्भातली (Corona vaccination) माहिती घेऊन ते वनविभागाच्या रोपवाटिकेला भेट देणार आहेत आणि तेथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान जिल्ह्यामध्ये पहाटे पाऊस पडल्यामुळे ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा त्यांच्या दौऱ्यावर काही परिणाम होतो का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.