मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

दोघांमध्ये 20 मिनिटांपर्यंत चर्चा...

Updated: May 1, 2020, 09:43 AM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट title=
फोटो सौजन्य : ANI

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली आहे. दोघांमध्ये 20 मिनिटांपर्यंत चर्चा झाली असून ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीदरम्यान महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छांसह राजकीय चर्चा झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यपालांकडे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या सहीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं आहे. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक लवकर घ्यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

२४ एप्रिल रोजी विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या. त्याची निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.