Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आतापर्यंतचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Updated: Jul 23, 2022, 05:20 PM IST
Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आतापर्यंतचा मोठा निर्णय title=

मुंबई : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील अशी मोठी घोषणा केली. यानंतर सर्व सोपस्कार पार पडले. एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला. तेव्हापासून शिंदे यांनी अनेक निर्णय घेण्याचा धडाका लावाला. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (cm eknath shinde will maharashstra tour in flood area soon)

मुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच महाराष्ट्र दौरा असणार आहे. राज्यात जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृशस्थिती निर्माण झाली. अनेकांचे संसारं उद्धवस्त झाली. त्यामुळे मुख्यमंत्री पूरग्रस्त भागात आणि राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट देणार आहेत. 

जनतेला मुख्यमंत्री आपलेच आहेत असे वाटलं पाहिजे, म्हणून या महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन करण्यात आलंय. या दौऱ्यामुळे आता मुख्यमंत्री 4 दिवस मंत्रालय आणि 3 दिवस दौऱ्यावर असणार आहेत.

दौऱ्याची रुपरेषा काय?

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची सुरुवात कुठून होणार आणि त्याचा शेवट कधी होणार, मुख्यमंत्री कोणत्या जिल्ह्यांना भेट देणार, याबाबतची सविस्तर माहिती आज संध्याकाळपर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत.

शिवसेना कोणाची निकाल 8 ऑगस्टला 

दरम्यान एकनाथ शिंदे बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती सुरुच आहे. एकनाथ शिंदे यांनी आता तर थेट शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा केलाय. त्यामुळे शिवसेना कोणाची यावरुन एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले आहेत. 

शिवसेना कोणाची हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात गेला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.