मुंबई : कर्नाटक सरकार उर्मटपण वागत आहे. बेळगावची उपराजधानी केली हा न्यायालयाचा अपमान नाही का ? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष या पुस्तिकेचं आज मुंबईत प्रकाशन झालं. यावेळी, बोलताना मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले.
या कार्यक्रमला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत. राज्य सरकारच्या सीमा कक्षाने ही पुस्तिका तयार केली.
ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार उर्मटपणाने वागत आहे. कोर्टात प्रकरण असतांना सुद्धा बेळगावची उपराजधानी केली हा न्यायालयाचा अपमान नाही का ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
निकाल लागत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासित का केला जात नाही ? हे आपण कोर्टात सांगितलं पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.