काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्री घेणार भेट

काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Updated: Jul 11, 2019, 01:03 PM IST
काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्री घेणार भेट title=

मुंबई : काँग्रेस आमदार भारत भालके भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री आमदार भालके यांच्या पंढरपूरमधल्या घरी भेट देणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी भेटीमागे राजकीय कारण असल्याची चर्चा आहे. भालके यांना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून भाजपमध्ये आणले जाईल, अशी चर्चा आहे.

भालके हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. आमदार भारत भालके विधानसभेत अनेक प्रश्नावर आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. त्यांनी पाणीप्रश्न आणि दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. त्यांना भाजपने गळाला लावल्याचे सांगितले जात आहे.

पाहा हा व्हिडिओ :