धक्कादायक! वरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर अनेक जखमी

मृतांचा आणि जख्मींचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Updated: Jul 24, 2021, 07:51 PM IST
धक्कादायक! वरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर अनेक जखमी

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील वरळीत (Worli) निर्माणाधीन इमारतीतील बांधकाम लिफ्ट (construction elevator) कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 7 पेक्षा अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने (Mumbai Fire Brigade) घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं आहे. तसेच स्थानिकही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. (construction elevator in the Lalit Ambika building in Worli collapsed 4 death and more than injured)

वरळीतील  ना म जोशी (N M Joshi) मार्गाच्या हद्दीतील हनुमान गल्लीतील ललित अंबिका (Lalit Ambika building) असं या इमारतीचं नाव आहे. या निर्माणाधीन इमारतीत काही काम सुरु होतं. या दरम्यान ही लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना केएम आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर मृत्यू झालेल्याचं नाव अजूनही समजू शकलेलं नाही.

आदित्य ठाकरे घटनास्थळी

दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी त्यांनी घडलेल्या सर्व घटनेचा आढावा घेतला.