ग्राहकांनो, जलद तक्रार निवारणासाठी इथं नोंदवा तक्रार...

ग्राहकांना त्यांच्या तक्रारींचं वेळेत निवारण करणारा प्रतिसाद संबंधित यंत्रणांकडून मिळत नसेल तर अशा ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवावी, असं आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण अध्यक्ष तसेच शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा नियंत्रक दिलीप शिंदे यांनी केलंय.

Updated: Oct 24, 2017, 05:23 PM IST
ग्राहकांनो, जलद तक्रार निवारणासाठी इथं नोंदवा तक्रार...  title=
मुंबई : ग्राहकांना त्यांच्या तक्रारींचं वेळेत निवारण करणारा प्रतिसाद संबंधित यंत्रणांकडून मिळत नसेल तर अशा ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवावी, असं आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण अध्यक्ष तसेच शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा नियंत्रक दिलीप शिंदे यांनी केलंय.
 
मुंबई शहर तसेच मुंबई उपनगरातील ग्राहकांच्या तक्रारींचे संबधित यंत्रणांकडून निर्धारित वेळेत निराकरण होत नसेल तर त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवावी, असं दिलीप शिंदे यांनी म्हटलंय. ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक आज आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
 

कुठे नोंदवाल तक्रार...

ग्राहकांना आपली तक्रार नोंदविण्यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही... राज्य शासनाच्या 'आपले सरकार' या पोर्टलवरूनही तक्रार नोंदविता येते. त्याचप्रमाणे जिल्ह्यासाठी मुख्यालय स्थळी हेल्पलाईन सेवा असून त्याचा क्रमांक 22852814 असा आहे... तर टोल फ्री क्रमांक 18003001947 किंवा 1800222262 या क्रमांकावरही तक्रार नोंदविता येते. तसेच dycor.ho-mum@gov.in या ई-मेलवरही ग्राहक तक्रार पाठवू शकतात.