कोरोना होऊन गेला असला तरी सावधान... लहान मुलांवर हे साईड इफेक्टस

कोरोना होऊन गेला असला तरी सावधान...

Updated: Mar 5, 2021, 09:45 PM IST
कोरोना होऊन गेला असला तरी सावधान... लहान मुलांवर हे साईड इफेक्टस title=

मुंबई : तुमच्या मुलांना कोरोना होऊन गेला असेल आणि आता ती ठणठणीत असतील तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका.. त्यांनी छोट्या मोठ्या दुखण्याच्या तक्रारी केल्या तरी त्याकडे लक्ष द्या... कारण ज्या लहान मुलांना कोरोना होऊन गेलाय, त्यांच्यासंदर्भात काही नवे दुष्परिणाम समोर आलेत. 

कोरोना एकदा का शरीरात घुसला आणि शरीरातून बाहेर पडला तरी तो प्रचंड त्रास देऊन जातो. त्यातून दुर्दैवानं लहान मुलंही सुटलेली नाहीत. कोरोनातून लहान मुलं बरी झाली तरी कोरोनाचे दुष्परिणाम कायम राहतायत. न्यूयॉर्क हेल्थ सिटी डिपार्टमेंटनं जारी केलेल्या अलर्टनुसार 

- कोरोनातून बरी झालेली मुलं आठवडाभरानं पुन्हा आजारी पडली.
- कोरोनातून बरं झालेल्या मुलांमध्ये मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम पाहायला मिळतोय .
- या आजारात शरीरात इन्फेक्शन वाढतं.
- दर पाच हजार मुलांमध्ये एक अशा प्रमाणात हे इन्फेक्शन होतंय.
- या मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोममध्ये दर ५३९ मुलांमागे दहा मुलांचा बळी जातोय.
- ६ ते १२ वयोगटातल्या मुलांवर कोरोनाचे दुष्परिणाम दिसतायत.
- पोटाचे विकार, ताप, ब्लड प्रेशर कमी होणं ही या मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणं आहेत. 

सध्या पाश्चिमात्य देशांमधल्या मुलांमध्ये हा आजार जास्त दिसतो आहे. पण तरीही मुलांच्या बाबतीत गाफील राहू नका. तुमच्या मुलाला कोरोना होऊन गेला असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या. मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची कुठलीही लक्षणं दिसली तरी लगेचच डॉक्टरांकडे जा.

राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. लहान मुलांमध्ये कोरोनाचे लक्षणं दिसत नसले तरी ते कोरोना व्हायरसचे वाहक बनतात. असं देखील संशोधनातून पुढे आलं आहे. त्यामुळे कोरोनाबाबत आणखी सतर्क राहण्याची गरज आहे.