राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९७; सांगलीत चौघांना लागण

राज्यात दिवसभरात 23 रुग्ण वाढले

Updated: Mar 23, 2020, 08:46 PM IST
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९७; सांगलीत चौघांना लागण title=
संग्रहित फोटो

मुंबई : देशभरासह राज्यातही कोरोनाचा कहर वाढतच आहे. मुंबईत पुन्हा कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळले आहेत. तर सांगलीत 4 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात 24 तासांत तब्बल 23 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 97वर पोहचली आहे. 

 

सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील लोक हज यात्रेसाठी गेले होते. त्यांना क्वोरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. या कुटुंबातील चार जणांचे रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 97वर पोहचली आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी राज्यात 12 नवे रुग्ण, रविवारी 10 रुग्ण आणि आज सोमवारी एका दिवसांत नव्या 23 रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत एकूण 41 रुग्ण असून आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 

तर, पुणे 16, पिंपरी-चिंचवड 12, नागपूर, यवतमाळ, कल्याण, नवी मुंबई, सांगलीत 4 कोरोना रुग्ण आढळले आहेत.