'लोकल, मेट्रो बंद ठेवणार नाही'

मुंबईत सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार...

Updated: Mar 17, 2020, 06:27 PM IST
'लोकल, मेट्रो बंद ठेवणार नाही' title=
संग्रहित फोटो

मुंबई : लोकल, मेट्रो सेवा बंद करणार नसल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरु राहणार आहे की नाही? याबाबत आता निर्णय देण्यात आला आहे. मुंबईत सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. गरज असेल तरच प्रवास करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. सध्या लोकल, बस बंद करण्याचा निर्णय नसल्याचं त्यांनी सांगितलंय. अनावश्यक प्रवास टाळला नाही तर, नाईलाजाने लोकल बंद कराव्या लागतील असंही ते म्हणाले.

कोरोनाचा फैलाव वाढत चालल्यामुळे मध्य रेल्वेने खबदारीचे उपाय म्हणून काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणजे १८ ते ३१ मार्चपर्यंत या गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. यात बहुतांशी राज्यांतर्गत धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर देशभरात धावणाऱ्यांमध्ये मुंबई-हावडा दुरन्तो एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस आणि सिंकदराबाद एक्स्प्रेसही रद्द करण्यात आलेल्या आहेत.