Coronaवर आयुर्वेद, होमिओपॅथीत उपचार?

साऱ्या जगात थैमान घालणाऱ्या या व्हायरसवर 

Updated: Mar 9, 2020, 07:37 PM IST
Coronaवर आयुर्वेद, होमिओपॅथीत उपचार?  title=
Coronaवर आयुर्वेद, होमिओपॅथीत उपचार?

मुंबई : जगभरात अगदी झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना Corona व्हायरसने अनेकांना धडकी भरली आहे. चीनमागोमाग इटली, इराणसारख्या देशांनाही या व्हायरसने विळखा घातल्याचं चित्र आहे. त्यातच भारताततही याविषयी कमालीची दहशत पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे एकिकडे भीतीचं वातावरण असतानाच आता सोशल मीडियावर कोरोनाविषयीचे अनेक मेसेज आणि जाहिरातींचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. 

साऱ्या जगात थैमान घालणाऱ्या या व्हायरसवर प्रभावी आणि उपयुक्त अशी लस नेमकी कोणती याचा शोध सर्वत्र घेतला जात आहे. संशोधक आणि वैद्यकशास्त्रात कार्यरत असणाऱ्या अनेकांनीच त्या रोखाने प्रयत्नांची शिकस्त सुरु केली आहे. यामध्येच आता कोरोनावर खात्रीशीर उपचार सापडलेल्याचा मेसेजही व्हायरल होत आहे. याचविषयी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 'झी २४तास'शी संवाद साधताना दिली. 

कोरोनाविषयीच्या याच फसव्या जाहिरातींविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासाठी कोणत्याही प्रकारचं अँटीव्हायरल ड्रग किंवा कोणत्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे नागरिकांनी कोणावरही कोणत्याही परिस्थितीत ;चुकीच्या जाहिराती आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. 

आयुर्वेद आणि होमिओपॅथी उपचारपद्धतीमध्ये कोरोनावर औषध असल्याचे अनेक मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. त्याचविषयी खुद्द आरोग्यमंत्र्यांनी हे फसवे मेसेज चुकीच्या पद्धतीने जनतेची फसवणुक करण्यासाठीच असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या लक्षणांसंबंधीसुद्धा काही मुद्दे मांडले. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नसून, कोणत्याही प्रकारचा संसर्गही झालेला नाही. त्यामुळे अधिकृत डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजानांवर भर द्यावा असं आवाहन केलं. 

पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल

बोगस जडीबुटी विक्रीला 

आय़ुषचा हवाला देत कोरोनावर अनेक जडीबुटी विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. मुलात होमिओपॅथीमध्ये सामाईक लक्षणं पाहून त्यावर उपाय केले जातात. तर, आयुर्वेदात चिकित्सा आजार, गुणधर्म पाहूनच होतात. मुळात कोरोना भारतात आलेला नसल्यामुळे भारतात त्या धर्तीवर अद्यापही संशोधन झालेलं नाही.