मुंबई : दिवसागणिक वाढणारी coronavirus कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन आणि राज्यातील आरोग्य विभागाकडून काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. शक्य त्या सर्व परींनी कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणाता आणण्याच्या या प्रयत्नांमध्ये राज्यात हवाई आणि रेल्वे मार्गानं येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा निगेटीव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.
दिल्ली एनसीआर, राजस्थान, गोवा, गुजरात या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोविडच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक आहे. पण, या सक्तीच्या अटीतून आता एका वर्गाला मात्र वगळण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. विमान वाहतू सेवेत असणाऱ्या केबिन क्र्यू, विमानातील स्टाफ यांची RT-PCR टेस्ट करु नये असं Dgci च्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्र तील सर्वच विमान तळावर विमानातील वैमानिक आणि crew यांची rtpcr टेस्ट करू नका असं या पत्रात म्हटलं आहे.
कोरोना चाचणीचे निगेटीव्ह अहवाल दाखवणं हे फक्त विमान प्रवासासाठीच सक्तीचं करण्यात आलं नसून, रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठीही हे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे स्थानकांर कोविड चाचणी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. जेथे रिपोर्ट नसणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी विमान क्रु मेंबर्संना या नियमातून मुक्ती देण्याचे आदेश दिले. राज्य सरकारला यासंदर्भात एअर इंडियाकडून एक विनंती करण्यात आली. वंदे भारत अभियानाअंतर्गत विविध उड्डाणं, कार्गो फ्लाईट्स महाराष्ट्रात नियमितपणे ये-जा करत असतात. यामुळं महाराष्ट्रात विविध राज्यातून मोठ्या प्रमाणावर क्रु मेंबर्स दाखल होत असतात.
कोरोना चाचणीतून वगळण्यात आलेल्या क्र्यू मेंबर्स आणि विमानसेवा कर्मचाऱ्यांकडे अधिकृत ओळखपत्र असणं मात्र अनिवार्य असणार आहे. राज्यातील सर्व विमानतळांवर हा नियम लागू करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत कोरोनाविरोधातील इतर सर्व निर्बंधांचं एअरलाईन्सनं पालन करणं मात्र बंधनकारक असेल.