मातोश्रीवर तैनात १०० हून अधिक पोलीस क्वारंटाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या एका चहावाल्याला कोरोनाची लागण...

Updated: Apr 6, 2020, 10:40 PM IST
मातोश्रीवर तैनात १०० हून अधिक पोलीस क्वारंटाईन

मुंबई : राज्यासह मुंबईतही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. बांद्रा कलानगर येथील चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर मातोश्रीवर तैनात असलेल्या १०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 

बांद्रा येथील उत्तर भारतीय संघाच्या हॉलमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कलानगर येथील चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मातोश्रीच्या गेट नंबर 2 पासून काही अंतरावर हा चहावाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाउसजवळ चहाची टपरी होती.

मातोश्रीजवळील संपूर्ण परिसर सनिटाईझ करण्यात आला आहे. मातोश्रीजवळील हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. संपूर्ण कलानगर सील करण्यात आलं आहे. त्यामुळे आता या भागातील वाहतूक, ये-जा बंद झाली आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. मुंबईतील अनेक भाग कोरोना हॉटस्पॉट ठरले आहेत.