फ्री..फ्री..फ्री, टीम इंडियाच्या विजयी रॅलीत व्हा सहभागी, वानखेडेवर चाहत्यांसाठी मोफत एन्ट्री... असा आहे संपूर्ण कार्यक्रम

Team India Victory Parade: टी20 वर्ल्ड चॅम्पियन संघ मायदेशात दाखल झाला आहे. दिल्लीत टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत झालं. ढोल-ताशांच्या तालावर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने ठुमके लगावले. आता क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती मुंबईत विजयी रॅलीची.

राजीव कासले | Updated: Jul 4, 2024, 02:49 PM IST
फ्री..फ्री..फ्री, टीम इंडियाच्या विजयी रॅलीत व्हा सहभागी, वानखेडेवर चाहत्यांसाठी मोफत एन्ट्री... असा आहे संपूर्ण कार्यक्रम title=

Team India Victory Parade : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून मायदेशात दाखल झाली आहे. विजेत्या संघाचं राजधानीत दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने ठुमकेही लगावले. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधानांची (PM Narendra Modi) भेट घेऊन चर्चा केली. आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती टीम इंडियाच्या विजयी रॅलीची. टीम इंडिया मुंबत दाखल होणार असून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा विजयी झाली होती. त्यावेळी देखील टीमची ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात आली होती. 17 वर्षांनंतर या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 

मुंबईत विमानतळावर दाखल झाल्यानंतर टी इंडियाची नरिमन पॉईंट ते वानखेडे मैदानापर्यंत ओपन बसमधून विजयी मिरवणूक (Victory Parade) काढण्यात येणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडिअमवर खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. यासाठी क्रिकेट चाहत्यांना वानखेडे स्टेडिअमवर मोफत एन्ट्री ठेवण्यात आली आहे. 

संध्याकाळी पाच वाजता विजयी रॅली
अंतिम सामन्यानंतर टीम इंडिया तीन दिवस वादळामुळे बारबाडोसमध्येच अडकली होती. अखेर विशेष विमानाने 4 जुलैला सकाळी 6 वाजता टीम इंडिया दिल्लीत दाखल झाली. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर दुपारी रोहित शर्मा आणि टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाले. संध्याकाळी पाच ते 7 वाजेपर्यंत टीम इंडियाची मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत विजयी रॅली काढली जाईल. यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि जय शाहने सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांना येण्याचं निमंत्रण दिलं आहे. 

विजयी रॅली मोफत पाहाता येणार
टीम इंडियाची विजयी रॅली चाहत्यांना मोफत पाहाता येणार आहे. याशिवाय स्टार स्पोर्ट्सच्य यूट्युब चॅनेलवरही चाहत्यांना लाईव्ह पाहाता येणार आहे. वानखेडे स्टेडिअममध्येही चाहत्यांना कोणतीही फी भरावी लागणार नाहीए. त्यामुळे टीम इंडियाच्या स्वागताचे प्रत्येक क्षण चाहत्यांना आपल्या मोबाईलमध्ये साठवता येणार आहेत. 

वर्ल्ड कप विजेती टीम इंडियाच्या रॅलीचा कार्यक्रम
दुपारी 2 वाजता टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवरून मुंबईसाठी निघणार
दुपारी 4 वाजता टीम इंडिया मुंबई विमानतळावर पोहोचणार
संध्याकाळी 5 वा. वानखेडे स्टेडियमवर पोहोचणार
संध्याकाळी 5 ते 7 - ओपन बस परेड
संध्याकाळी 7 ते 7.30 - वानखेडे इथं कार्यक्रम
संध्याकाळी 7.30 - ताज हॉटेलसाठी रवाना होणार