विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास; देवेंद्र फडणवीस केदारनाथाच्या दर्शनाला

विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास उरल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

Updated: Oct 23, 2019, 03:35 PM IST
विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास; देवेंद्र फडणवीस केदारनाथाच्या दर्शनाला title=

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंडात केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह दिसत आहेत.

विधानसभा निवडणुकीत ३७० चा मुद्दा उचलण्याची काय गरज होती- संजय राऊत

फडणवीस यांची ही केदारनाथ वारी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केदारनाथाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे फडणवीसांनी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा आहे.

साताऱ्याचा निकाल १२ तास उशीरा लागणार

विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास उरल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असे भाकीत वर्तविले आहे. झी २४ तास आणि 'पोल डायरी' यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात भाजपला १२१-१२८, शिवसेना ५५ ते ६४, काँग्रेस ३९ ते ४६, राष्ट्रवादी काँग्रेस ३५ ते ४२, वंचित १ ते ४ आणि मनसेला १ ते ५ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे भाकीत कितपत खरे ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.