मुंबई : मी माझे म्हणणे स्पष्टपणे सांगितले आहे. पक्षप्रमुख म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटलो आहे. त्यावेळी मी माझे संपूर्ण म्हणणे सांगितले आहे. आता पक्ष म्हणून जो काही निर्णय होईल. मी संपूर्ण बाजू मांडली आहे. जो पक्ष निर्णय घेईल, तो मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.
राजीनाम्याबजद्दल पक्ष निर्णय घेईल, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सगळी माहिती दिलेली आहे. राजीनाम्याबद्दल पक्ष काय तो निर्णय घेईल, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. तर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिले आहे. पक्षातल्या लोकांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढल्याचे कळत आहे
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरुणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर विरोधक सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अखेर यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. आम्ही कोणीही याप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. भाजप वेगवेगळ्या मागण्या करत आहेत, भाजपचे हे काम आहे, पण मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, बलात्कराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली. तसेच धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील फेटाळून लावले होते.