ढेरपोट्या पोलिसांना राष्ट्रपती पदक नाही

पोट सुटलेल्या पोलीसांचा यापुढे राष्ट्रपती पोलीस पदकासाठी विचार केला जाणार नाही.

Updated: Sep 15, 2017, 09:12 AM IST
ढेरपोट्या पोलिसांना राष्ट्रपती पदक नाही

नवी दिल्ली : पोट सुटलेल्या पोलीसांचा यापुढे राष्ट्रपती पोलीस पदकासाठी विचार केला जाणार नाही.

केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात नियमावली जारी केलीय. कायदा आणि सुव्यवस्थची जबाबदारी असलेल्यांनी शारिरिकदृष्ट्या तंदूरुस्त असणं गरजेचं असल्याचं असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलंय.

राष्ट्रपती पोलीस पदकं ही आपल्या कामात वैशिष्ट कामाबद्दल दिली जातात. अशी पदकं इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणेचे स्त्रोत असतात. त्यामुळे ती पदकं उत्तम शाररिक स्थितीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच देण्यात येतील असं मंत्रालयानं म्हटलंय. 

शिवाय पोलीस कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचारे किंवा इतर कुठल्याची गैरप्रकाराचे आरोप असतील त्यांनाही पदकांच्या शर्यतीतून बाद करण्यात आलंय.