मोठी बातमी । मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी EDकडून इक्बाल कासकर होणार अटक

ED set to question Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Underworld Don  Dawood Ibrahim) याचा भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला ईडीकडून (Enforcement Directorate (ED) अटक होण्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 16, 2022, 03:42 PM IST
मोठी बातमी । मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी EDकडून इक्बाल कासकर होणार अटक title=

मुंबई : ED set to question Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Underworld Don  Dawood Ibrahim) याचा भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला ईडीकडून (Enforcement Directorate (ED) अटक होण्याची शक्यता आहे. ईडीने मकोका कोर्टात कस्टडी मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. इकबाल कासकरला ड्रग्जप्रकरणी एनसीबीनं ताब्यात घेतले असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या अटकेसाठी ईडीनं अर्ज केला आहे.

इक्बाल कासकर याचा ताबा घेण्यासाठी EDने मकोका न्यायालयात अर्ज केला आहे. अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. ईडीने इक्बाल कासकर याची कस्टडी मागितली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोठडीची मागणी करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी इक्बाल कासकरवर ही कारवाई करत आहे. याप्रकरणी ईडीनं 4 ते 5 जणांची चौकशी केली आहे. तसेच आणखी काही जणांची चौकशी केली जाणार आहे. छोटा शकीलचा जवळचा साथीदार सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट याची ईडीने 9 तास काल चौकशी केली. आज त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन आणि फरार दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, त्याचे साथीदार आणि टोळीतील सदस्यांची ईडी चौकशी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी कासकरला ताब्यात घेऊ शकतात आणि त्याच्या भावाच्या साथीदारांच्या कारवायांबाबत त्याची चौकशी करु शकतात.

ईडीने अलीकडेच इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करण्यात आणि देशभरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

ईडीने दाखल केलेल्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर कासकरला ताब्यात घेण्यात येणार आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2017 मध्ये त्याच्यावर खंडणीच्या तीन गुन्ह्यांची नोंद केल्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल झाल्यानंतर कासकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित घटकांवर ईडीने मंगळवारी सकाळी मुंबईतील विविध ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने दाऊद इब्राहिमची बहीण दिवंगत हसिना पारकर हिच्या नागपाडा परिसरातील निवासस्थानाचीही झडती घेतली.