Viral Video : मृत्यू पाहिलेली माणसं

मृत्यू कधी, कुठे आणि कसा येईल हे कुणालाच सांगता येणार नाही. पण एखाद्याचं नशीब बलवत्तर असेल तर तो मृत्यूलाही हुलकावणी देऊ शकतो.  

Updated: Jul 20, 2022, 10:23 PM IST
Viral Video : मृत्यू पाहिलेली माणसं title=

मुंबई :  मृत्यू कधी, कुठे आणि कसा येईल हे कुणालाच सांगता येणार नाही. पण एखाद्याचं नशीब बलवत्तर असेल तर तो मृत्यूलाही हुलकावणी देऊ शकतो. असेच काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतायेत. जे पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचा थरकाप उडेल. (fact check viral video sensetional videos gose viral on social media see)

सध्या सोशल मीडियात मृत्यूला हुलकावणी दिल्याचे काही व्हिडिओ वेगानं व्हायरल होतायेत. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाच तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, आता हा व्हिडिओ पाहा. 

एक ट्रेन मध्येच थांबल्यानंतर काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरतात. त्यात एक कुटुंबही खाली उतरतं. त्याचवेळी विरूद्ध दिशेकडून भरधाव वेगात एक ट्रेन येते. आणि पुढच्या काही क्षणात सुरू होतो जीवन-मृत्यूचा खेळ. या महिलेकडे नीट पाहा. ती आधी आपल्या बॅगा घेऊन ट्रॅकच्या पलिकडे जाऊन टाकते. 

मात्र तिची आणखी एक बॅग मागे राहिली म्हणून ती पुन्हा माघारी जाते. पण त्याचवेळी भरधाव ट्रेन तिकडून येते. अंगावर काटा उभा राहावा असाच हा प्रसंग..एका सेकंदाचाही जर उशीर झाला असता तर ही महिला यमसदनी गेली असती. पुन्हा एखदा बघा हा व्हिडिओ.

आता हा दुसरा व्हिडिओ पाहा. भरधाव वेगात हा बाईकस्वार निघाला होता. त्याचवेळी एक बस वळण घेत होती. अचानक याची बाईक घसरते आणि तो थेट बसच्या मागच्या चाकाखाली येतो. त्याचं डोकंच बसच्या चाकाखाली येतं. पण बसचालकानं प्रसंगावधान राखत ब्रेक दाबला आणि या बाईकस्वाराचा जीव वाचला. 

पुन्हा एकदा पाहा या बाईकस्वारासोबत काय घडलं, डोळ्यांची पापणीही लवते न लवते इतक्या कमी वेगात हा बाईकस्वार बसखाली सापडतो. पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या बाईकस्वाराच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय. 

आता हा तिसरा व्हिडिओ पाहा. पावसाळ्यात गाड्या सावकाश चालवा अशा सूचना नेहमी केल्या जातात. मात्र तरीही काही बाईकस्वार वेगाला आवर घालत नाहीत. पावसामुळे रस्ता निसरडा झालेला होता. 

अशातच भरधाव वेगात आलेल्या बाईकस्वाराची बाईक घसरली. तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात एक ट्रक येत होता. मात्र बाईकचालकानं क्षणाचाही विलंब लावला नाही. जिवाच्या आकांतानं त्यानं ट्रकसमोरून धाव घेतली त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावलाय. पाहा या पठ्ठ्यानं नेमकं काय केलं.

या व्हायरल व्हिडिओतल्या व्यक्तींना नशिबानं साथ दिलीय. मात्र प्रत्येकवेळी असं घडेलंच असं नाही. त्यामुळे तुम्ही असलं धाडस करू नका, वाहनं चालवताना, ट्रॅक क्रॉस करताना काळजी घ्या. नाहीतर कदाचित हा तुमच्या आयुष्यातला शेवटचा व्हिडीओ ठरू शकतो.