मुंबई : शेतकरी (Farmers) त्याने पिकवलेला माल हा कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) विकण्यासाठी आणतो. मात्र अडते, दलाल या आणि यांच्यासारख्या अनेकांकडून शेतकऱ्याची लूट केली जाते हे सर्वांनाच माहिती आहे. विक्री व्यवस्थेत शेतकऱ्याची लूट होते. मात्र आता यापुढे ही लूट होणार नाही. बळीराजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठा निर्णय घेतला आहे. (farmers crop will be registered through computer at the entrance of the market yard)
नक्की काय निर्णय?
शेतकऱ्याच्या मालाची आता मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावरच कंम्प्युटरद्वारे नोंदणी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार आवारात माल पोहोचल्याची माहिती समजणार आहे. अडते व्यापाऱ्यांना आपल्या गाळ्यावर किती शेतमालाची आवक झाली, याची तडक एसएमएसद्वारे माहिती मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टळणार आहे.