सुकाणू समितीचा पुन्हा सरकारविरोधात एल्गार

शेतकरी सुकाणू समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आंदोलनाबाबतचा निर्णय घेण्यात आला.

Updated: Oct 31, 2017, 07:39 PM IST
सुकाणू समितीचा पुन्हा सरकारविरोधात एल्गार title=

मुंबई : शेतकरी सुकाणू समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आंदोलनाबाबतचा निर्णय घेण्यात आला. सुकाणू सरकार सरकारविरोधात आता आक्रमक झालीय. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला रास्त भाव या मागणीसाठी 10 नोव्हेंबरला आंदोलन करण्यात येणार आहे. 

सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर राज्यभर जेल भरो आंदोलन केलं जाणार आहे. सरकारी कार्यलयात हे आंदोलन केलं जाणारे. सरकारी कार्यालयात सोयाबीन, दूध आणि इतर शेतमाल ओतून आंदोलन केलं जाणार आहे.

वीज बीलाची अन्यायकारक वसुली थांबवावी, शेतक-यांचं वीज कनेक्शन तोडणा-या वीज कंपन्यांविरोधात उद्यापासून टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.  येवढंच नाही तर ८ नोव्हेंबरला नोटबंदीच्या वर्षपूर्ती निमित्त नोटबंदीचं वर्षश्राद्ध घातलं जाणार आहे.