अखेर चुनाभट्टी- बीकेसी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

चुनाभट्टी- बीकेसी उड्डाणपूल अखेर आज संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुला 

Updated: Nov 10, 2019, 05:28 PM IST
अखेर चुनाभट्टी- बीकेसी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला  title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला चुनाभट्टी- बीकेसी उड्डाणपूल अखेर आज संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. अशी घोषणा काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 'चुनाभट्टी- बीकेसी उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबईकरांच्या वेळेत आता ३० मिनिटांची बचत होणार आहे' असं वक्तव्य काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

त्याचप्रमाणे चुनाभट्टी- बीकेसी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न देखील सुटणार आहे. या उड्डाणपुलासाठी राष्टवादी काँग्रेसने आंदोलनही केले होते. याच आंदोलनाचा धसका घेत शनिवारपासून पूल सूरू करण्याचे आश्वासन एमएमआरडीएकडून करण्यात आले होते. 

परंतु ऐनवेळी पुलाची काही कामे शिल्लक असल्यामुळे पूल सुरू करता येणार नसल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले . त्यानंतर आमदार नवाब मलिक यांनी शुक्रवारी पुलाची पाहणी देखील केली आणि पूलाचे काम पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागेल असे अधिकाऱ्यांना सांगितले होते.