Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..
Mumbai News: 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा स्मृतिदिन. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची पहाट सूर्योदयानं नव्हे, तर सूर्यास्तानं झाली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. याचपार्श्वभूमीवर 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2022) बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेकडून (BMC) खास व्यवस्था करण्यात आली आहे. 7 डिसेंबरपर्यंत भीम अनुयायांसाठी बेस्ट प्रशासनाकडून (Best) खास उपक्रम राबवण्यात आला असून संपूर्ण मुंबईत (Mumbai News) अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे.
महापरिनिर्वाण दिनासाठी (Mahaparinirvan Din 2022) मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी 50-60 रुपयांचा पास बेस्ट प्रशासनाने जाहीर केला आहे. 6 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत चलो स्मार्ट कार्ड (chalo smart card) शिवाय हा पास उपल्बध असणार आहे. शिवाजी पार्क, चैत्यभूमी या ठिकाणी हे पास मिळणार असून अधिकाधिक लोकांनी हे पासेस खरेदी करावे असं आवाहन बेस्ट प्रशासनाने केलं आहे.
वाचा : लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी
भीम अनुयायांसाठी मोफत सहल
तसेच डॉ. बाबासाहेबांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) वास्तव्याने पावन झालेल्या अशी अनेक ठिकाणं मुंबई शहरात आहे. मुंबई शहरातील या ऐतिहासिक ठिकाणांची सफर घडवण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागातर्फे मोफत बस फेरीचे आयोजन करण्यात आलं आहे. 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' असं या फेरीचं नाव आहे. मुंबई सर्किटसाठी आयोजित केलेल्या मोफत बस फेरीदौरान दादर (पश्चिम) येथील चैत्यभूमी, दादर (पूर्व) भागातले डॉ. बाबासाहेबांचे राजगृह हे निवासस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, परळ येथील बीआयटी चाळ आणि दक्षिण मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजला भेट दिली जाईल. सहलीसाठी दररोज 4 बसेस धावत आहेत. लोकांना फर्स्ट कम फर्स्ट आधारावर घेतले जात आहे.
कशी असेल सहल?
या मोफत बस फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना सकाळी 9 वाजता दादर (dadar shivaji park) येथील शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथे एकत्र जमायचे आहे. पर्यटकांना बसने चैत्यभूमी (Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak) आणि त्यानंतर राजगृहाकडे नेले जाईल. त्यानंतर बीआयटी चाळ क्र.1 खोली क्र. 50/51 येथे नेण्यात येईल. या दौऱ्याची सांगता फोर्ट भागातील सिद्धार्थ कॉलेज येथे होईल. पर्यटकांना सोडण्यासाठी दुपारी 2 च्या सुमारास बस दादरच्या शिवाजी पार्काजवळील गणेश मंदिराजवळ (जिथून दौऱ्याला सुरुवात झाली होती) परत येणार आहे.
सहलीसाठी दररोज 4 बसेस धावणार आहेत. ‘फर्स्ट कम फर्स्ट’ आधारावर या बस फेरींमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या टूरमध्ये सहभागी होण्यासाठी पर्यटक फोनद्वारे नोंदणी करू शकतात. मुंबईत होणाऱ्या या मोफत सहलीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. तसेच ऑफलाइन नाव नोंदणीसाठी 7738375812 ( विक्रम) किंवा 7738375814 (रसिका) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या टूरमध्ये सहभागी होण्यासाठी ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करू शकतात. मुंबईत ऑनलाईन नोंदणीसाठी Dr. Babasaheb Ambedkar Tourism Circuit या लिंकवर क्लिक करा. तर ऑनलाईन नोंदणी करावी.
ठाकरे गटाकडून मोफत भोजन
बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे बीएमसी जिमखाना शिवाजी पार्क येथे चैत्यभूमीवर येणाऱ्या सुमारे पाच लाख अनुयायांसाठी विनामूल्य जेवण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे इथे जेवण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना बसून व्यवस्थित पोटभर जेवण वाढण्यात येणार आहे.
स्थळ: शिवाजी पार्क पेट्रोल पंपाच्या बाजूला, बीएमसी जिमखाना मैदान
अधिक माहितीसाठी संपर्क : 9987373333 ( श्री. राम रेपाळे, माजी नगरसेवक, ठाणे महानगरपालिका)