गणेशभक्‍तांना महागाईचा फटका

गणेशोत्सवाआधी वस्तू महागल्या

Updated: Sep 12, 2018, 05:05 PM IST
गणेशभक्‍तांना महागाईचा फटका

मुंबई : गणेशोत्‍सवाला उद्यापासून सुरवात होते आहे. लाडक्‍या बाप्‍पांच्‍या आगमनाच्‍या पूर्वसंध्‍येला बाजारात खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली आहे. गणेशोत्‍सवासाठी आरास, सजावटीचे साहित्‍य तसेच पूजेसाठी, शोभेसाठी फुले, फळे यांची खरेदी मोठया प्रमाणावर सुरु आहे. गौरीपूजेसाठी लागणारी सुपेही बाजारात विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत. 

यंदा महागाईचा फटका गणेशभक्‍तांना बसतो आहे. प्रसाद, मोदक यांचे भाव किलोमागे 50 रूपयांनी वाढले आहेत तर फळांचा भाव देखील वधारला आहे. काही दिवसांपूर्वी भाव मिळत नसलेला झेंडू देखील भाव खावू लागला आहे. आकाराप्रमाणे 150 ते 200 रुपये किलो असा सध्‍या झेंडूचा दर आहे. बाजारात भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे.