मुंबई : लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.
हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यानं याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी 'मॅट'मध्ये दाद मागणं अपेक्षित असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.
न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे याबाबतची सुनावणी झाली. बीड पोलीस अधिक्षक कार्यालयात काम करणाऱ्या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी सुटी द्यावी असा अर्ज केलाय.
बीड पोलीस अधिक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीस दल आणि राज्याचं गृह विभाग देखील यासंदर्भात पुढे काय करायचं याचा विचार करतायत. कारण ललितानं लिंगबदल शस्त्रक्रियेनंतरही पोलीस दलातील आपली नोकरी कायम रहावी, अशी मागणी लावून धरलीय.