Sanjay Raut : ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हल्ला, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut on Roshni Shinde Attack :  ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या आदेशानेच झालीय, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

Updated: Apr 4, 2023, 10:53 AM IST
Sanjay Raut : ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हल्ला, संजय राऊत यांचा गंभीर आरोप title=

Sanjay Raut on Roshni Shinde Attack : ठाण्यात सरकार पुरस्कृत हल्ला घडवून आणला आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या आदेशानेच झालीय, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाण्यात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे राज्य आहे की नाही, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

आम्हालाही हल्ला करता येतो. ठाण्याच्या पोलिसांनी हातात बांगड्या भरल्या आहेत का? एका महिलेवर हल्ला केला जात आहे. हल्ल्या करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. राज्यात कायदा आहे का की नाही? हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन होत आहे. तुम्ही पोलिसांना बाजुला ठेवा, मग बघा?, असा इशारा देताना राऊत म्हणाले, आम्हालाही हल्ला करता येतो. त्यावेळी समजेल हल्ला काय असतो तो. 

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आव्हान दिले आहे. सरकारमधील बाजार बुणग्यांवर कठोर कारवाई कधी करणार, असा सवाल त्यांनी केलाय. आमदार राहुल कुल, मंत्री दादा भुसे आणि भाजप नेते किरीट सोमय्यांच्या भ्रष्टाचारावर आपण काय कारवाई करणार असा सवाल राऊत यांनी या पत्रातून फडणवीसांना केला आहे. 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कधी कठोर कारवाई करणार ?

महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी विनंती केली आहे. बाजार बुणगे सरकारात आहेत. आपल्या सोबत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणार, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. मात्र फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिंदे गटाने रोशनी शिंदे यांना मारहाण केली. ही संपूर्ण मारहाण सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे.  ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. मात्र अजून एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत संजय राऊत यांनी राज्यात कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल केला आहे.