बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

12th board exam : राज्य शिक्षण महामंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  

Updated: Feb 9, 2022, 07:50 AM IST
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी title=
संग्रहित फोटो

मुंबई : 12th board exam : राज्य शिक्षण महामंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून मिळणार आहे. (Hall tickets for the 12th board exam will be available from today.)

आज दुपारी 1 वाजल्यानंतर परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahasscboard.in  या वेबसाईटवर हॉल तिकीट उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. तसेच शाळा आणि कॉलेजकडून ऑनलाईन हॉलतिकीट प्रिंट करुन दिली जाणार आहेत.