रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली

रुळाला तडे गेल्याने हार्बरची सेवा सकाळी सकाळी खोळंबलीय. सकाळी साडे सातच्या सुमारास चेंबूर स्टेशनजवळ रुळाला तडा गेल्यानं वेळापत्रकाचे तीन तेरा वाजलेत. 

Updated: Dec 12, 2017, 10:18 AM IST
रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली  title=

मुंबई : रुळाला तडे गेल्याने हार्बरची सेवा सकाळी सकाळी खोळंबलीय. सकाळी साडे सातच्या सुमारास चेंबूर स्टेशनजवळ रुळाला तडा गेल्यानं वेळापत्रकाचे तीन तेरा वाजलेत. 

मुंबईकडे येणाऱ्या गाड्या उशिराने

मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर रुळाला तडा गेल्यानं गाड्या थांबल्या आहेत. कामावर निघालेल्या चाकारमान्यांचे हाल होत आहेत. रुळाचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं. 

गर्दीच्यावेळी वेळापत्रक कोलमडले

तब्बल तासभरानंतर तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरु करण्यात आलीय. पण ऐन गर्दीच्या वेळी वेळापत्रक मात्र पूर्त कोलमडले आहे.