HDFC बँकेला मोठा झटका! RBIने क्रेडिट कार्ड्स, डिजिटल लॉन्चवर घातली बंदी

भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर (HDFC Bank) जोरदार झटका देत बँकेवर तात्पुरती बंदी घातली आहे.  

Updated: Dec 3, 2020, 05:28 PM IST
HDFC बँकेला मोठा झटका! RBIने क्रेडिट कार्ड्स, डिजिटल लॉन्चवर घातली बंदी  title=

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर (HDFC Bank) जोरदार झटका देत बँकेवर तात्पुरती बंदी घातली आहे. त्यामुळे HDFC Bank ला आपले व्यवहार बंद ठेवावे लागणार आहेत.  खासगी क्षेत्रातील आघाडीवर असणाऱ्या बँकेला हा दणका मानला जात आहे. दरम्यान, आम्ही आयटी यंत्रणेवर काम करत असून लवकरात लवकर यंत्रणा ठीक करू तसेच आरबीआयच्या संपर्कात राहू अशी हमी एचडीएफसी बँकेने दिली आहे. या निर्बंधांचा बँकेच्या एकूण व्यवसायावर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वासही एचडीएफसी बँकेने व्यक्त केला आहे.

देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीला (HDFC) मोठा धक्का बसला आहे. एचडीएफसी बँकेचे नवीन डिजिटल लॉन्च, (Digital Launch) अ‍ॅक्टिव्हिटी, आयटी अ‍ॅप्लिकेशन आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यास आरबीआयने बंदी घातली आहे. गेल्या दोन वर्षात एचबीएफसी बँकेच्या इंटरनेट बँकिंग,  (Internet Banking) मोबाइल बँकिंग, अनेक वेळा पैसे भरण्याबाबत अडचणी येत आहेत, त्यामुळे आरबीआयने ( RBI ) हा आदेश जारी केला आहे.

रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला २ डिसेंबर २०२० रोजी एक नोटीस बजावली आहे. एचडीएफसी बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी सर्व्हिसेसमधील अडचणींबाबत गेल्या दोन वर्षात ही नोटीस बजावण्यात आली आहे. २१ नोव्हेंबर रोजी आरबीआयनेही या समस्येवर प्रश्न केला होता. २१ नोव्हेंबर रोजी, बँकेच्या प्राथमिक डेटा सेंटरमध्ये वीज अपयशी झाल्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात समस्या आल्या.

एचडीएफसी बँकेने  शेअर बाजाराला सांगितले आहे की, आरबीआयच्या या कारवाईचा सध्याच्या क्रेडिट कार्डवर किंवा डिजिटल बँकिंगवर परिणाम होणार नाही. आरबीआयच्या या आदेशाचा बँकेच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही. आरबीआयने आपल्या आदेशानुसार डिजिटल २.० अंतर्गत सर्व नवीन लॉन्च तात्पुरते थांबवण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच नवीन क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या प्रस्तावित आयटी अनुप्रयोगांवर आणि सोर्सिंगवर बंदी घालण्यास सांगण्यात आले आहे. आरबीआयने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, अनियमिततेचे कारण काय होते याची चौकशी बँकेच्या बोर्डाने करावी. एचडीएफसीच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय येण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांमध्ये काही वेळा घडले आहेत.