Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: आज 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर आले आहेत. दादरमधील चैत्यभूमी भीम अनुयायांच्या गर्दीनं फुलून गेली आहे. सर्वत्र निळ वादळ पाहायला मिळतंय. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी रांगा लावल्याचं दितं आहे शिवाजीपार्क मैदानात भीम अनुयायांसाठी पालिकेनं खास व्यवस्था केलीय. तसेच दादरवरुन चैत्यभूमीवर कसे पोहोचाल? हे पाहा.
दादर आणि चैत्यभूमीवर अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्टने बसच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. यंदा बेस्टकडून चैत्यभूमीसाठी विशेष सेवा देण्यात येणार आहे. 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत ही बससेवा असणार आहे. दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी या रुटवरील दर 15 ते 20 मिनिटांनी बससेवा पुरवली जाणार आहे. या शिवाय 60 रुपयांचा बस पास देखील प्रवाशांच्या सोयीसाठी मर्यादित कालावधीपर्यंत देण्यात येणार आहे.
मुंबईच्या विविध भागांतून चैत्यभूमीसाठी 4 डिसेंबरला बसमार्ग क्रमांक 200, 241, ए 351 आणि 354 यावर बससेवा चालवण्यात येणार आहे. 6 डिसेंबरला शिवाजी पार्क येथूनही सी 33, ए 164, 241, सी 305, ए 351, 354, ए-357, ए-385, सी-440 आणि सी-521 या बसमार्गावर अतिरिक्त बसचे सोडण्यात आल्या आहे. जेणेकरून नियमित प्रवासभाड्यात प्रवाशांना चैत्यभूमी येथे पोहोचणे शक्य होईल.
(हे पण वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?)
आंबेडकर अनुयायी 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या आठवणी असलेल्या जागांना आवर्जून भेट देत असतात. यासाठी बेस्ट विभागाने विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. या बसही छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाजवळून उपलब्ध करण्यात येतील. सकाळी साडेसात ते सकाळी 10 वाजेपर्यंत या फेऱ्या सेवेत असतील.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.