मुंबई : समुद्रात तरंगणारी महाकाय बेटासारखी - वर्ल्ड क्लास भारतातील पहिली शानदार क्रूझशीप कर्णिकाचा शुक्रवारी नामकरण सोहळा पार पडला. यावेळी ५ रूपयांचा स्टॅम्प देखील रिलीज करण्यात आला. या समारोहाची सुरूवात तिरंगा झेंडा फडकवून, राष्ट्रगीताने करण्यात आली. या शानदार शीप नामकरण सोहळ्यासाठी भारताचे प्रसिद्ध अॅथलीट मिल्खा सिंह उपस्थित होते, तसेच राज्यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा, अभिनेत्री सुष्मिता सेन, प्रसिद्ध टेनिस पटू महेश भूपती, बॉक्सर मेरीकॉम देखील उपस्थित होती. या समारोहाला राज्यसभेचे खासदार सुभाष चंद्रा प्रमुख पाहुणे होते.
या क्रूझला कर्णिका नाव समुद्र मंथनाच्या एका कहाणीवरून देण्यात आलं आहे. ज्यात देवता आणि राक्षसांच्या मंथनाने, अप्सरा कर्णिकाची निर्मिती होते. हे नाव भारताच्या खऱ्या ओळखीशी जुळलेलं आहे. देशातील काशी शहराच्या सर्वात मोठ्या, पहिल्या घाटाचं नाव देखील कर्णिका आहे. कर्णिकाचं नामकरण सोहळ्याची सुरूवात पुजाऱ्यांनी भजन आणि मंत्रोच्चाराने केली. मुख्य पुजाऱ्यांनी नारळ फोडलं, यानंतर कर्णिका हे नाव देण्यात आलं. यासह कर्णिकाचे अधिकारी, स्टाफ, क्रू आणि सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
जलेश क्रूझचे प्रेसिडेंट आणि सीईओ जुरगेन बेलोम यांनी म्हटलंय, जलेश क्रूझचं कर्णिका भारताचं पहिलं प्रिमियम शीप आहे. याला अतिशय सुंदरतेने भारत आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी सजवण्यात आलं, त्या दर्जाचं बनवून घेण्यात आलं आहे.
कर्णिकासाठी देशातील सुप्रसिद्ध लोकांना एकाच मंचावर आणून, एक मोठा ऐतिहासिक समारोह साजरा करण्यात आला. मिल्खा सिंह म्हणाला, यानिमित्ताने भारताने एका नव्या जागतिक पर्वाची सुरूवात केली आहे. तसेच काही दिवसात देशी विदेशी कंपन्या देखील यात स्पर्धा करण्यासाठी पुढे सरसावतील, असा विश्वास मिल्खा सिंग यांनी व्यक्त केला.
तसेच सुष्मिता सेन यांनी म्हटलं आहे की, भारत विविधतेत एकता असणारा देश आहे, आणि अशात एक थोडी जी कमतरता होती, ती आता जलेश क्रूझने पूर्ण केली आहे. जलेश क्रूझ लायनरला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. कर्णिका क्रूझशीप अतिशय अद्भूत आहे, पर्यटकांना कर्णिका खूप भावणारी आहे.
मेरीकॉम यावर म्हणते, हे क्रूझ खूपच सुंदर आहे. तसेच मला येथे आल्यानंतर खूप छान वाटतंय. महेश भूपतीने म्हटलं आहे, देश नवीन इतिहास बनवतोय, कर्णिका एक अद्भूत क्रूझ आहे, कर्णिका क्रूझ नामकरण सोहळा, मार्की थिएटरमध्ये पार पडला.
पर्पल आणि पिंकिश रंगाचं आकर्षक कर्णिका क्रूझ अरब सागरात तरंगताना त्यात प्रवास करण्याचा अनुभव स्वर्गापेक्षा कमी नाही. कार्निका क्रूझशीप ही १४ मजल्यांची क्रूझ आहे. १५०० ते २ हजार प्रवासी क्षमतेसह कार्निका क्रूजची लांबी २५० मीटर आहे. या क्रूझला पाहून डोळे विस्फारतात, समुद्रात तरंगणारं हे क्रूझ, सेव्हन स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही.
कर्णिका क्रूझचा बाहेरचा नजारा काही और आहे, एवढं शानदार दृश्य तुम्ही कधी पाहिलंच नसेल. या शानदार क्रूझमध्ये प्रवेश केल्यानंतर डोळे दिपावणारी दृश्य तुम्हाला दिसतील. चौदा मजल्याच्या कर्णिका क्रूझमध्ये प्रवेश करताना, जगातील सर्व सौंदर्यवान गोष्टी तुमच्यासमोर असल्याचा भास होतो.
क्रूझमध्ये शॉपिंग करण्यासाठी शानदार शॉपिंग सुविधा उपलब्ध आहे. खूपच आकर्षक असलेल्या रेस्टॉरंटमध्ये देशी-विदेशी पर्यटकांच्या जिभेवर सतत चव रेंगाळेल असे मेन्यू आहेत. मनोरंजनासाठी क्रूझवर खास कॅसिनोची व्यवस्था केलेली आहे. समुद्रात तरंगणाऱ्या या कर्णिकात दोन मोठे स्विमिंग पूल देखील आहेत, ज्यात तुम्ही स्विमिंग करण्याचा अनुभव घेऊ शकतात. क्रूझमध्ये युवक आणि लहान मुलांच्या मनोरंजनाचा देखील विचार करण्यात आला आहे. मुलांसाठी असणारं वॉटरपार्क देखील खूपच आकर्षक आहे.
कर्णिका क्रूझमध्ये प्रवेश करताना, प्रवाशांना त्यांच्या खोल्यांमध्ये पाऊल ठेवतांना क्रूझवर विशेष आदरतिथ्यं केलं जातं हे जाणवणे स्वाभाविक आहे. खोल्यांमध्ये सजवलेल्या खास खिडक्या समुद्रातील आकर्षक दृश्याकडे नजर पुरवतात. आणि विशेषतः खोल्यांच्या बाहेर असलेली बाल्कनी, पर्यटकांना जगातील आकर्षक दृश्यांपर्यंत नेतात. आंतरराष्ट्रीय पहिल्या क्रूझ जहाजचा प्रवास करणे प्रत्येकाला आवडेल. कर्णिका क्रूझशीपमध्ये प्रवास करताना हृदय आकर्षक आणि नवनवीन दृश्य पाहून फुलतं.
क्रूझवर 24 तास उघडं राहणारं कॉफीशॉप आहे. यात अगदी अतिथींच्या आवडत्या घरगुती व्यंजनांपर्यंत लक्ष ठेवण्यात आले आहे. क्रूझचे सीईओ, जर्जेन बेलम म्हणतात की, ही भारताची पहिली क्रूझशीप आहे. यात प्रवास करणं खूप शानदार अनुभव आहे. आतिथींची विशेष काळजी घेतली जाते. यात प्रत्येक सुखसुविधा देण्यात आली आहे. खरेदीपासून मनोरंजनापर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. भारतातील क्रूझ जहाजमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला भारतीय डोसापासून आणि इतर सर्व पदार्थ उपलब्ध आहेत.
या क्रूझच्या बाबतीत ट्रॅव्हल अँड टूर इंडस्ट्रीचे लोक म्हणतात की, यामुळे देश आगामी काळात पर्यटन क्षेत्रात नवीन उंची गाठू शकणार आहे. टूर ऑपरेटर दिग्विजय त्रिपाठी म्हणतात की, जे लोक परदेशात जावून क्रूझच्या सफरीचा आनंद घेत होते, त्यांना आता ही सुविधा देशातच मिळणार आहे, त्यामुळे जास्तच जास्त लोक हा प्रवास अनुभवू शकतील.
कर्णिका क्रूझशीप आपल्या वेगवेगळ्या मार्गांविषयी माहिती देणार आहे. मुंबई-गोवा-मुंबई या मार्गावर ही सेवा सुरू झाली आहे. ही आकर्षक, सर्वोत्तम क्रूझशीप सेवा, मुंबई-चेन्नई, विशाखापट्टणम मार्गांवर देखील उपलब्ध असेल. कर्णिका क्रूझशीप देशीविदेशी पर्यटकांसाठी, सिंगापूर, दुबई आणि खाडी देशातील सर्वात आकर्षक शहरांमध्ये देखील सेवा देणार आहे.
कर्णिका क्रूझशीप ही देशातील पर्यटन क्षेत्रातील नवं पाऊल असणार आहे. कारण भारतातील क्रूझ इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. मागील दोन वर्षात, २०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रूझच्या माध्यमातून, सव्वा दोन लाख पर्यटकांनी भारताचा दौरा केला. भारताचे पोर्ट यासाठी वेगाने विकसित होत आहेत. यातील प्रमुख सहा आहेत, त्यात मुंबई पोर्ट, मोर्मुगाव पोर्ट, न्यू मँगलोर पोर्ट, कोच्चीन पोर्ट, चेन्नई पोर्ट, आणि कोलकाता पोर्टचा समावेश आहे.
आता एक भारतीय कंपनीने यात जोरदार पदार्पण केलं आहे. यात फक्त स्थानिक पर्यटन विकसित करण्यावर भर देण्यात आलेला नाही तर. भारतीय पर्यटकांना क्रूझ पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय क्रूझची गरज पडायला नको, हा देखील उद्देश आहे.