राज्यपाल दयावान व्यक्ती, ४८ तास मागितले तर सहा महिन्यांची मुदत दिली- उद्धव ठाकरे

'आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती, राज्यपालांनी सहा महिन्यांची दिली'

Updated: Nov 12, 2019, 10:42 PM IST
राज्यपाल दयावान व्यक्ती, ४८ तास मागितले तर सहा महिन्यांची मुदत दिली- उद्धव ठाकरे title=

मुंबई : राज्यपालांनी तीन दिवसांची मुदत वाढवून न दिल्याने सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. न्या. शरद बोबडे ही सुनावणी घेणार आहेत. दरम्यान, आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती, राज्यपालांनी सहा महिन्यांची दिली, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

 भाजपची मुदत संपण्यापूर्वीच आम्हाला वेळ देण्यात आली.  काल शिवसेनेने अधिकृत काँग्रेस राष्ट्रवादीशी संपर्क केला हे महत्वाचे आहे. काल केलेला दावा आजही कायम आहे.  आम्ही ४८ तासांची मुदत हवी हाेती.  काँग्रेस, राष्ट्रवादीला जशी स्पष्टता हवी तशी आम्हालाही हवी आहे. सहा महिन्यांचा काळ आम्हाला मिळाला आहे.  किमान समान कार्यक्रम काँग्रेस, राष्ट्रवादीसाेबत तयार करू व सरकार बनवू, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. 

वेगळ्या विचारधारेचे शब्द एकत्र कसे येणार, हा अनेकांसमाेर प्रश्न आहे. मात्र, भाजप मुफ्ती माेहम्मद कसे एकत्र आले, असा सवाल उपस्थित करत आम्ही सत्तेच्या लाेभापायी नादी लागलाे नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रत्येक संपर्कात नव्या गाेष्टी ठरवल्या जाणार असतील त्याला काही अर्थ नाही, असे ते म्हणालेत. 

राष्टपती राजवट लागू झाली तरी पुन्हा शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. किमान समान कार्यक्रमावर काँग्रेसचा भर आहे. त्यानंतर काँग्रेस सत्तेत सहभागी होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सत्तेत सहभागी होण्याबाबत विचारविनिमय झाला. आता काँग्रेसचे नेते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना या बैठकीतील निर्णय सांगणार आहेत. त्यानंतर पुढील दिशा पुढे होणार आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला होता. मात्र, त्यांना १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करता आले नाही. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा न देता थेट सत्तेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.