खंडणी मागणारे अजून मोकाट कसे? चव्हाणांचा सवाल

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून बोगस छापे मारून खंडणी वसुलीचा व्हिडिओ 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. 

Updated: Aug 11, 2017, 08:20 PM IST
खंडणी मागणारे अजून मोकाट कसे? चव्हाणांचा सवाल title=

मुंबई : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून बोगस छापे मारून खंडणी वसुलीचा व्हिडिओ 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. 

खंडणी वसूल करणाऱ्या या दोन्ही व्यक्तींना अजून अटक का होत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला. फोनवर बोलणारी व्यक्ती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण असल्याचं सांगत होती, असंही जयंत पाटलांनी नमूद केलंय. त्यामुळं दीपक सांडव आणि अरुण लाड अजूनही मोकाट फिरत असून त्यांना अटक करण्याची मागणी जयंत पाटलांनी केली.  

केमिकल कंपन्यांवर बोगस छापा घालून उद्योजकांकडून कशी खंडणी वसूल केली जाते, याचा धक्कादायक व्हिडिओ 'झी २४ तास'नं काल दाखवला होता. विशेष म्हणजे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचं नाव सांगून ही बोगस कारवाई करण्यात आल्याचं उघड झालंय.