केईएममध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा काम करण्यास विरोध

केईएम रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा काम करण्यास नकार

Updated: Apr 8, 2020, 05:57 PM IST
केईएममध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा काम करण्यास विरोध  title=

मुंबई : कोरोनाचे संकट वाढत असताना मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संभावित कोरोना रुग्ण असणाऱ्या अतिदक्षता विभागात आणि कक्षामध्ये काम करण्यास या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.

डॉक्टर आणि नर्सेस रूग्णसेवेत असताना चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी मात्र संबंधित वॉर्डात कामास नकार देत असल्याचे समोर येतंय. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांनाच धोका पत्करून कामं करावी लागत आहेत. 

योग्य पीपीई नसताना असे रुग्णाचे नातेवाईक सरसकट रुग्णासाठी राबत आहेत. यामुळे त्यांना तसेच त्यांच्या घरातील इतरांना कोरोना होण्याचा मोठा धोका निर्माण झालाय. युनियनचे नेते त्यांना पाठीशी घालत असल्यानं केईएम प्रशासन हतबल झाले आहे.

धारावीत १० वा रुग्ण 

धारावीत कोरोनाचा १० वा रूग्ण सापडला आहे. केईएम रूग्णालयाच्या एमआयसीयूत काम करणाऱ्या ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. 
ही महिला धारावीच्या मुस्लिमनगरमध्ये राहते. यामुळे धारावीत कोरोनाचे एकूण १० रूग्ण झाले आहेत.