Mumbai Rains : ढगांमुळे संध्याकाळी पाच वाजताच मुंबई अंधारली, राज्यातही पावसाची जोरदार हजेरी: पाहा Video

मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली आहे. 

Updated: Sep 7, 2022, 06:27 PM IST
Mumbai Rains : ढगांमुळे संध्याकाळी पाच वाजताच मुंबई अंधारली, राज्यातही पावसाची जोरदार हजेरी: पाहा Video title=

मुंबई : मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकाडाटासह जोरदार पाऊस बरसतोय.मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण झालाय. मुंबईसह ठाणे (Thane), नवी मुंबईत (New Mumbai)  आणि रायगडमध्येही (Raigad) पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्यात गेले काही दिवस प्रचंड उकाडा सहन करावा लागत होता. मात्र पावसाच्या या हजेरीमुळे मुंबईकरांची उकाड्यातून सुटका झालीय. (lightning and heavy rain in mumbai new mumbai raigad and various district of maharashtra)

मुंबईत एलबीएस रोडवर पाणी

मुंबईत एलबीएस रोडवर (Lbs Road) पाणी साचलंय.  यामुळे वाहनचालकांचे हाल होतायेत. तसेच वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतोय. एलबीएस मार्ग हा मुंबईतला गजबजलेला वाहतुकीचा मार्ग आहे. मात्र याच मार्गावर आता पाणी साचलंय.