Mumbai Ganesh Visarjan 2023 : 'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Mumbai Ganesh Visarjan 2023 :'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Mumbai Ganesh Visarjan 2023 : 'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Ganesh Visarjan 2023 : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पा आता निरोप घेतला. मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्ली मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा राजा अशा गणपती मंडळांच्या मिरवणुकांनी लालबाग परळ परिसर खुलून गेला होता.  तर, शहराच्या इतर भागांमधून येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या. अतिशय वाजत गाजत गणपती बाप्पा आले आणि अखेर पाहुणचार घेऊन आपल्या गावी गेले. पाहता पाहता आनंदाचे हे दिवस कसे सरले अनेकांनाच कळलं नाही. पण, या उत्सवाची सांगता सर्वांनीच एका आशादायी आश्वासनानं केली. आता ओढ पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची... गणपती बाप्पा मोरया!!!

28 Sep 2023, 19:16 वाजता

Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर पोहोचणार, विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेणार

28 Sep 2023, 18:32 वाजता

Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE: गिरगाव चौपाटीवर वाजत-गाजत बाप्पाचे विसर्जन, अनेक सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांचे विसर्जन पार पडले

 

28 Sep 2023, 17:34 वाजता

Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE:  गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी; बाप्पाला वाजत-गाजत निरोप

28 Sep 2023, 17:28 वाजता

Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE:  श्रॉफ बिल्डिंगमधून गणारायावर पुष्पवृष्टी

28 Sep 2023, 16:23 वाजता

Ganesh Visarjan 2023: तेजुकायाचा गणराय विसर्जनासाठी चौपाटीवर पोहोचला

28 Sep 2023, 16:03 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE : जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनासाठी तैनात असलेल्या तरुणावर वीज कोसळली

28 Sep 2023, 15:55 वाजता

तेजुकाया गणराय विसर्जनासाठी मार्गस्थ, मिरवणुकीत भक्तांची अलोट गर्दी

28 Sep 2023, 15:55 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE : मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, बाप्पावर सुरेख पुष्पवृष्टी

28 Sep 2023, 15:38 वाजता

बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी, मुंबईतील काही भागांत पावसाला सुरुवात

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा- पावसात भिजतच करावं लागणार गणेश विसर्जन; पुढील 24 तास महत्वाचे, 'या' भागासाठी हवामान खात्याचा अलर्ट

28 Sep 2023, 14:39 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: लालबाग मार्केटमधून लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी