Ganesh Visarjan 2023 : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पा आता निरोप घेतला. मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्ली मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा राजा अशा गणपती मंडळांच्या मिरवणुकांनी लालबाग परळ परिसर खुलून गेला होता. तर, शहराच्या इतर भागांमधून येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या. अतिशय वाजत गाजत गणपती बाप्पा आले आणि अखेर पाहुणचार घेऊन आपल्या गावी गेले. पाहता पाहता आनंदाचे हे दिवस कसे सरले अनेकांनाच कळलं नाही. पण, या उत्सवाची सांगता सर्वांनीच एका आशादायी आश्वासनानं केली. आता ओढ पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची... गणपती बाप्पा मोरया!!!
28 Sep 2023, 14:25 वाजता
Ganesh Visarjan 2023 LIVE : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील बाप्पाचे भक्तिभावात विसर्जन
28 Sep 2023, 13:23 वाजता
Ganesh Visarjan 2023 LIVE : लालबाग मार्केट येथील श्रॉफ बिल्डींग पृष्पवृष्टी मंडळाकडून मुंबईचा राजा, तेजुकायाचा राजा या सार्वजनिक बाप्पांवर सुरेख पुष्पवृष्टी.
28 Sep 2023, 13:17 वाजता
Ganesh Visarjan 2023 LIVE : उत्सव राजाचा… सोहळा शिवराज्यभिषेकाचा
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून लालबाग मुख्य गेटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानाचा मुजरा सादर.
28 Sep 2023, 12:07 वाजता
Ganesh Visarjan 2023 LIVE : लालबागच्या रस्त्यांवर गुलालाची उधळण. महत्त्वाच्या मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ; मंडळांमधील मित्रत्वानं जिंकली मनं
28 Sep 2023, 12:05 वाजता
Ganesh Visarjan 2023 LIVE: आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी लालबाग, काळाचौकी परिसरामध्ये अनेक मंडळाचे गणपती विसर्जनाकरिता बाहेर पडणार असून यावेळी त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेस होणारी गैरसोय टाळण्यासाठी खालील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
आज दिनांक २८-०९-२०२३ रोजी लालबाग, काळाचौकी परिसरामध्ये अनेक मंडळाचे गणपती विसर्जनाकरिता बाहेर पडणार असून यावेळी त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जनतेस होणारी गैरसोय टाळण्यासाठी खालील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. #वाहतूक_व्यवस्था pic.twitter.com/BaiPIIHo1c— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 28, 2023
28 Sep 2023, 12:00 वाजता
Ganesh Visarjan 2023 LIVE: गणेश चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जनासाठी मुंबईत जय्यत तयारी झाली सुरु झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलानं देखील कबर कसली आहे. यासाठी तब्बल 19000 पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात असणार आहेत. मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्या नारायण यांनी सांगितलं आहे.
28 Sep 2023, 11:56 वाजता
Ganesh Visarjan 2023 LIVE : मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या असून, लालबाग- परळ परिसर भाविकांनी फुलला आहे.
28 Sep 2023, 10:42 वाजता
Ganesh Visarjan 2023 LIVE: सुखकर्ता दुखहर्ता... असं म्हणत शंखनादामध्ये लालबागच्या राजाची आरती संपन्न झाली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांनी साश्रू नयनांनी बाप्पाला आळवत त्याच्यापुढं आपल्या मनातील भाव मांडले.
28 Sep 2023, 10:11 वाजता
Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईच्या राजाची आरती सुरु, कार्यकत्यांची गर्दी. गणरायापुढे सारे नतमस्तक.
28 Sep 2023, 09:49 वाजता