Mumbai Ganesh Visarjan 2023 : 'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Mumbai Ganesh Visarjan 2023 :'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Mumbai Ganesh Visarjan 2023 : 'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Ganesh Visarjan 2023 : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पा आता निरोप घेतला. मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्ली मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा राजा अशा गणपती मंडळांच्या मिरवणुकांनी लालबाग परळ परिसर खुलून गेला होता.  तर, शहराच्या इतर भागांमधून येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या. अतिशय वाजत गाजत गणपती बाप्पा आले आणि अखेर पाहुणचार घेऊन आपल्या गावी गेले. पाहता पाहता आनंदाचे हे दिवस कसे सरले अनेकांनाच कळलं नाही. पण, या उत्सवाची सांगता सर्वांनीच एका आशादायी आश्वासनानं केली. आता ओढ पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची... गणपती बाप्पा मोरया!!!

28 Sep 2023, 09:25 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: लालबाग राजाला स्वरांजली बँड पथक देणार पहिली सलामी. मुख्य दारावर राजाला सलामी. 

 

28 Sep 2023, 09:21 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी करण्यात आलेल्या गर्दीमध्ये कोळी बांधवांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. कोळ्यांचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचरणी सलामी देण्यासाठी म्हणून गुरुवारी सकाळपासूनच कोळी बांधवांनी येण्यास सुरुवात केली. 

हेसुद्धा वाचा : पालखी निघाली राजाची...; लालबागच्या राजापुढं कोळी बांधवांनी पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका 

 

28 Sep 2023, 08:48 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईचा राजा गणेशगल्लीतून विसर्जन मार्गावर मार्गस्थ. मंडळातील कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी आणि असंख्य भक्तगणांच्या साथीनं बाप्पांची मिरवणूक सुरु. ढोलताशा आणि तालवाद्यांचा गजर! 

28 Sep 2023, 08:09 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईच्या राजाची आरती सुरु झालेली असतानाच तिथं लालबाग परिसरामध्ये कोळी बांधवांनी लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरण्यास सुरुवात केली आहे. 

 

28 Sep 2023, 07:55 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईतील विसर्जन मिरवणुकांवर प्रशासनाची नजर असणार असून, या मिरवणुकांच्या धर्तीवर काही नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 13 पुलांवर विसर्जन मिरवणुकांसाठी निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

- मरिन लाइन्स रेल्वे ओव्हर ब्रिज

- ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मधील पूल

- फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)

- केनडी पूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)

28 Sep 2023, 07:38 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: (Maharashtra Rain) विसर्जन मिरणुकांमध्ये गर्दीचा जनसागर उसळलेला असतानाच पावसाचीही हजेरी असणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह पुण्यात आणि कोकणात विसर्जनाच्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी असणार आहे. मागील चार दिवसांपासून कमीजास्त प्रमाणात सक्रिय असणारा पाऊस पुढील 24 तासांमध्ये आणखी जोर धरताना दिसणार आहे.

 

28 Sep 2023, 07:08 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: राजा तेजुकायाचा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशोत्सव मंडळांकडूनही बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास निघणार असून, तिथून परळमधून नरेपार्क- परळचा राजा, लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पोस्टगल्लीचा राजा असे बाप्पा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहेत. 

28 Sep 2023, 07:00 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांचं थेट प्रक्षेपण... 

28 Sep 2023, 06:58 वाजता

28 Sep 2023, 06:49 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बाप्पाची विसर्जन मिरवणूक गणेशगल्लीच्या गणपतीनंतर सुरु होणार असून, सकाळी 10  वाजता लालबागच्या राजाची आरती होणार आहे. तर, त्यानंतर तासाभरानं म्हणजेच सकाळी 11 वाजता लालबागच्या राजाची मिरवणुक शाही थाटात लालबाग मार्केटमधून निघणार आहे. यावेळी कोळी बांधवांसह भक्तांचा जनसागर लोटल्याचं पाहायला मिळेल. शुक्रवारी सकाळी 6 वाजता गिरगाव चौपाटीवर लालबागाच्या राजाचं आगमन होणार असून, त्यानंतर आरती करून विसर्जन सोहळा सुरू होणार आहे.