Mumbai Ganesh Visarjan 2023 : 'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Mumbai Ganesh Visarjan 2023 :'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Mumbai Ganesh Visarjan 2023 : 'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Ganesh Visarjan 2023 : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पा आता निरोप घेतला. मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्ली मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा राजा अशा गणपती मंडळांच्या मिरवणुकांनी लालबाग परळ परिसर खुलून गेला होता.  तर, शहराच्या इतर भागांमधून येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या. अतिशय वाजत गाजत गणपती बाप्पा आले आणि अखेर पाहुणचार घेऊन आपल्या गावी गेले. पाहता पाहता आनंदाचे हे दिवस कसे सरले अनेकांनाच कळलं नाही. पण, या उत्सवाची सांगता सर्वांनीच एका आशादायी आश्वासनानं केली. आता ओढ पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची... गणपती बाप्पा मोरया!!!

28 Sep 2023, 06:41 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली, मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार विसर्जन मिरवणुकीचं नियोजन खालीलप्रमाणे. 
विसर्जन सोहळा आरती - 8.00 वाजता
विसर्जन मिरवणुक सुरुवात - 8.15 वाजता 
पहिली पुष्पवृष्टी - 8.30 वाजता 
मुख्य प्रवेशद्वार कार्यक्रम - 12 वाजता 

 

28 Sep 2023, 06:35 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग परळ परिसरामध्ये मोठा जनसमुदाय लोटतो. ढोल ताशाच्या गजरामध्ये गाजत वाजत मोठ्या जल्लोषात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली जाते.बाप्पाला निरोप देण्यासाठी तरुणाई मोठी गर्दी करत असते. यावर्षीही हेच वातावरण पाहायला मिळणार आहे.