Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: राज्याच्या राजकारणात अखेर तो महत्त्वाचा दिवस उजाडला असून, या दिवशी नेमक्या कोणत्या नाट्यमय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा अखेर होणार आहे.
राज्यात उलथापालथ घडवणाऱ्या सत्तासंघर्षावर बुधवारी फैसला होणार असून, शिवसेना आमदार अपात्रतेता निकाल आज लागणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार याचा फैसला अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्रता निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष करणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष निकालाचे वाचन करतील. 500 पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेत ते निकाल वाचतील. निकालाची मुळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना नंतर दिली जाणार आहे.
10 Jan 2024, 18:14 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असून भरत गोगावलेंचा व्हिप योग्य, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे.
10 Jan 2024, 18:10 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: शिंदेंचा गट हीच खरी शिवसेनाः राहुल नार्वेकर
10 Jan 2024, 18:06 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: ठाकरे गटाचे अनेक युक्तीवाद फेटाळले; आत्तापर्यंतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने
10 Jan 2024, 18:02 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: एकनाथ शिंदेंना काढण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाहीः राहुल नार्वेकर
10 Jan 2024, 17:59 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे लोकशाहीसाठी घातकः नार्वेकर
10 Jan 2024, 17:50 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करता येणार नाही, पक्षप्रमुख ठाकरेंना शिंदेंना हटवण्याचा अधिकार नाहीः नार्वेकरांचे महत्त्वाचे निरीक्षण
10 Jan 2024, 17:48 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: घटनेच्या १० व्या परिशिष्टात पक्षाचा नेता कोण याचा उल्लेख करण्यात आला आहे. २७ ऑक्टोबर २०१८ च्या लीडरशिप स्ट्रक्चरनुसार निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे.यानंतर पक्षात दोन परस्पर विरोधी गट निर्माण झाले आणि दोन्ही पक्षांनी खरा पक्ष असल्याचा दावा केला. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार सभापतीला हे ठरवण्याचा अधिकार आहे.
10 Jan 2024, 17:46 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: दोन्ही गटाचा शिवसेना पक्षावर दावा, पक्षाचा प्रमुख कोण एवढंच ठरवणारः राहुल नार्वेकर
10 Jan 2024, 17:43 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: 2018ला पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळं 2018ची नेतृत्व रचना मान्य करता येणार नाहीः पक्षनेतृत्वाबाबत राहुल नार्वेकरांचे निरीक्षण
10 Jan 2024, 17:32 वाजता
Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या, निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेची प्रत मान्यः राहुल नार्वेकर