उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेकडून अमोल किर्तीकरांना उमेदवारी?

 अमोल किर्तीकर युवासेनेचे सचिव आहेत.

Updated: Mar 13, 2019, 01:05 PM IST
उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेकडून अमोल किर्तीकरांना उमेदवारी?

मुंबई : लोकसभेसाठी शिवसेनेच्या अंतिम उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. परंतु अंतिम यादी सामना वृत्तपत्रातून जाहीर होणार असल्याची माहिती आहे. पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी विद्यमान खासदारांची मातोश्रीवर जोरदार फिल्डींग सुरु आहे. आनंदराव अडसूळ आणि अरविंद सावंत यांच्यासह गजानन किर्तीकर आणि त्यांचा मुलगा अमोल किर्तीकरही मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदासंघातून गजानन किर्तीकर यांच्या ऐवजी अमोल किर्तीकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अमोल किर्तीकर युवासेनेचे सचिव आहेत.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदासंघातून गजानन किर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत. गजानन किर्तीकर यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांच्या ऐवजी मुलाला उमेदवारी दिली जावू शकते. अमोल किर्तीकर यांनी याधी विधानसभा निवडणूकही लढवली होती. युवा सेनेचे पदाधिकारी असल्याने आदित्य ठाकरे यांच्याकडूनही त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी मदत होऊ शकते. युती झाल्यामुळे शिवसेनेच्या अडचणी येथे कमी झाल्या आहेत.

About the Author