मुंबई : लोकसभा निडवणूक २०१९ मध्ये ईशान्य मुंबईतून (North East Mumbai) भाजपा खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी मनोज कोटक यांच्या नावाची चर्चा आहे. सोमय्यांवर शिवसेना नाराज असल्यानं हा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जातंय. सोमय्या यांच्या उमेदवारीला मुख्यत्वे शिवसेनेचा आक्षेप आहे. भाजप आणि शिवसेनेत कटुता तीव्र असताना सोमय्या यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. शिवसेना आणि सोमय्या यांच्यात कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. सोमय्या हे उमेदवार असल्यास शिवसेनेची मदत भाजपला मिळू शकणार नाही. दुसरीकडे सोमय्या हे मात्र उमेदवारीबाबत आशादायी आहेत.
मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्थात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील १७ जागांसाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे.
मुंबईमध्ये भाजपा तीन तर शिवसेना तीन जागांवर लढणार आहे. या निवडणुकीसाठी गुरुवारी भाजपानं देशभरातील आपल्या १८४ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. यामध्ये महाराष्ट्रातील १६ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत मुंबईत पूनम महाजन (मुंबई उत्तर मध्य) आणि गोपाळ शेट्टी (मुंबई उत्तर) यांना दुसऱ्यांदा सधी मिळालीय.
नंदूरबार (एससी) - डॉ. हिना विजयकुमार गावित
धुळे - डॉ. सुभाष रामराव भामरे
रावेर - रक्षा निखिल खडसे
अकोला - संजय शामराव धोत्रे
वर्धा - रामदास चंद्रभानजी तडस
नागपूर - नितीन जयराम गडकरी
गडचिरोली - चिमूर (एसटी) - अशोक महादेवराव नेते
चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहीर
जालना - रावसाहेब दानवे पाटील
भिवंडी - कपिल मोरेश्वर पाटील
उत्तर मुंबई - गोपाळ चिनय्या शेट्टी
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन
अहमदनगर - सुजय विखे पाटील
बीड - प्रीतम गोपिनाथ मुंडे
लातूर (एससी) - सुधाकर भालेराव श्रृंगारे
सांगली - संजय काका रामचंद्र पाटील