लोकसभा निवडणूक २०१९ : शिवसेनेच्या उमेदवारांची नावं जाहीर

सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे

Updated: Mar 22, 2019, 03:41 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : शिवसेनेच्या उमेदवारांची नावं जाहीर  title=

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची नावं शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी २१ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये उस्मानाबाद इथून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देऊन रविंद्र गायकवाड यांचा पत्ता शिवसेनेनं कापलाय.

हे आहेत शिवसेनेचे उमेदवार

दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे

ठाणे - राजन विचारे

उत्तर पश्चिम मुंबई - गजानन किर्तीकर

कल्याण - श्रीकांत शिंदे

रायगड - अनंत गिते

रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत 

कोल्हापूर - संजय मंडलिक

हातकणंगले - धैर्यशिल माने

नाशिक - हेमंत गोडसे

शिर्डी - सदाशिक लोखंडे

शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील

औरंगाबाद - चंद्रकांत खैरे

वाशिम - भावना गवळी

बुलडाणा - प्रतापराव जाधव

रामटेक - कृपाल तुमाने

अमरावती - आनंदराव अडसूळ

परभणी - संजय जाधव

मावळ - श्रीरंग बारणे

हिंगोली - हेमंत पाटील

उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर 

सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. ११, १८, २३, २९ एप्रिल आणि ६, १२ आणि १९ मे रोजी निवडणुका होणार आहेत. सर्व टप्प्यातील मतमोजणी ही २३ मे रोजी होईल. २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार टप्प्यात मतदान होणार आहे. ११ ते २९ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात मतदान होणार आहे. यंदा सर्व मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदाराला आपलं मत योग्य उमेदवाराला गेलं की नाही त्याची पडताळणी करण्यात येणार आहे.