Loudspeaker row: राज ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस, इम्तियाज जलील यांची सर्वपक्षीय बैठकीला दांडी

Loudspeaker row: राज्यात भोंग्यावरुन (Maharashtra loudspeaker controversy) सुरु असलेला वाद अजून संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविली जाणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 

Updated: Apr 25, 2022, 12:00 PM IST
Loudspeaker row: राज ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस, इम्तियाज जलील यांची सर्वपक्षीय बैठकीला दांडी title=

मुंबई : Loudspeaker row: राज्यात भोंग्यावरुन (Maharashtra loudspeaker controversy) सुरु असलेला वाद अजून संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविली जाणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पण सर्वपक्षीय बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आताच हाती आलेल्या वृत्तानुसार भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार इम्तियाज जलील हेही नेते उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. 

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होणार नाहीत, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित राहणार नाहीत. सर्वपक्षीय बैठकीसाठी आत्तापर्यंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री अस्लम शेख, अनिल परब, उदय सामंत,  आमदार वारीस पठाण, रईस शेख देखील पोहोचले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगाकर, नितीन सरदेसाई पोहोचले आहेत. तसेच  मंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण , उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित आहेत. आता या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकत आहे. भोंग्याबाबत निश्चित धोरण या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला होता. राज्यातील भोंगाचा मोठ्या आवाजाचा उल्लेख करुन, विशेषत: मशिदींमधून अजानच्यावेळी  (Azaan Row) भोंगा वाजतो. हे भोंगे 3 मे पर्यंत पूर्णपणे उतरविण्यात यावेत, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  राज्य सरकारला दिला आहे. तसे न झाल्यास जे काही घडले त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे ते म्हणालेत. त्यानंतर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन गृहविभागाने केले होते. मात्र, प्रमुख नेत्यांनी दांडी मारली आहे.