मुंबईत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ गुंतवणूकदार परिषद सुरू

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ ही गुंतवणूकदार परिषद सुरू झाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 18, 2018, 09:40 PM IST
मुंबईत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ गुंतवणूकदार परिषद सुरू title=

मुंबई : मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ ही गुंतवणूकदार परिषद सुरू झाली आहे. या परिषदेच्या माध्यमातून ३५ लाखांचा रोजगार आणि १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे. 

उद्धव ठाकरेंना कार्यक्रमाचं आमंत्रण नाही

दुसरीकडे, या कार्यक्रमाचेही निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही.  इंदू मिलमध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमातही उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात नव्हतं आलं. त्यामुळे  शिवसेनेने तीव्र नाराजी आहे.