Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

Maharashtra Budget 2024 Updates :  उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.   

नेहा चौधरी | Updated: Feb 27, 2024, 10:27 AM IST
Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार? title=
Maharashtra Budget 2024 Ajit Pawar will present the interim budget of the state What will be announced in the background of the election

Maharashtra Budget 2024 Updates : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (26 फेब्रुवारी) सुरु झालं आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सरकार काय घोषणा करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Budget 2024 Ajit Pawar will present the interim budget of the state What will be announced in the background of the election) राष्ट्रवादीत बंड करुन अजित पवार हे काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी दिली गेली आहे. त्यामुळं यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. (Maharashtra Budget 2024 Ajit Pawar will present the interim budget of the state What will be announced in the background of the election)

अजित पवार काय घोषणा करणार?

 पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज यासारखा घोषणा आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आमदारांच्या मतदारसंघातील रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प यांसह अन्य कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत एकूण 8 हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेनंतर या पुरवणी मागण्या मान्य करण्यात येणार आहेत. 

राज्य सरकारचं सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक आक्रमक भूमिकेत होते. विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्याशिवाय विविध मुद्द्यांवरुन सराकराविरोधात जोरदार टीका करत आहेत. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्यात. हे फसवं आणि गुंडाराज सरकार असल्याची घोषणाबाजी विरोधकांनी दिल्यात. या सरकारनं मराठा आणि ओबीसी समाजाला फसवलं असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.