Shiv Sena : शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वालाच सुरूंग?

महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Political Crisis) सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

Updated: Jul 14, 2022, 10:31 PM IST
Shiv Sena : शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वालाच सुरूंग? title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Political Crisis) सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.  शिवसेनेला (Shiv Sena) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक मोठा झटका बसणाराय. कारण शिवसेना खासदारांचा मोठा गट पक्षातून फुटण्याची शक्यता आहे. (maharashtra political crisis eknath shinde and shivsena uddhav thackeray war)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवलीय. आमदारांच्या यशस्वी बंडानंतर आता शिवसेनेच्या दोन तृतीयांश खासदारांचा लोकसभेत स्वतंत्र गट तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीला शिवसेनेचे 19 पैकी 15 खासदार उपस्थित असल्याचं समजतंय.  धक्कादायक बाब म्हणजे शिवसेना खासदारांच्या दबावामुळं भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली.

मात्र त्यानंतरही शिवसेनेच्या खासदारांचा गट एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याचं समजतंय. दरम्यान, शिवसेना खासदार फुटणार असल्याच्या बातमीचा शिवसेनेकडून इन्कार केला जातोय.

आमदार आणि नगरसेवकांनंतर खासदारही फुटले तर शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणाराय... तसं झाल्यास उद्धव ठाकरेंची आगामी राजकीय वाटचाल आणखी खडतर होणाराय.