Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी देखील ठाकरे गटाला (Thackeray Group) 'जय महाराष्ट्र' केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत. आज दुपारीच गोऱ्हे यांचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला होता. त्यानंतर युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश केला. मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर आपण एका संविधानिक पदावर असल्याने याचे उत्तर देणार नाही निलम गोऱ्हे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता निलम गोऱ्हेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे काही आमदारांनी तक्रार केल्यानंतर हे सगळं नाराजीनाट्य सुरु झाल्याचे म्हटलं जात आहे. उपसभातपी असून देखील आमदारांना त्या बोलू देत नाही अशी तक्रार करण्यात आली होती. याची दखल देखील उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांची शिंदे गटासोबत जवळीक वाढल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता निलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातील 11 पैकी तीन आमदार हे शिंदे गटात गेले आहेत.
कोण आहेत निलम गोऱ्हे?
पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएएमएसची पदवी घेतली आहे. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
नीलम गोऱ्हे या सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. विधानपरिषदेत त्यांनी शिवसेनेच्या प्रतोद म्हणून काम पाहिलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात त्यांनी काम केलं आहे. शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. तसेच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या स्टार प्रचारक म्हणूनही त्या सक्रिय होत्या.
पहिल्या महिला उपसभापती नीलम गोऱ्हे
2002 ते 2008, 2008 ते 2014, 2004 ते आजपर्यंत विधानपरिषद सदस्या म्हणून कार्यरत आहेत. जून 2019 मध्ये उपसभापतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र विधानमंडळात तब्बल 55 वर्षानंतर विधानपरिषदेवर पहिल्या महिला उपसभापतीपदी बसण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. नीलम गोऱ्हे यांना 2014 च्या युती सरकारच्या काळात मंत्री मिळेल अशा चर्चा होत्या परंतु त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती.
राजकारण्यात येण्यापूर्वी नीलम गोऱ्हे समाजकार्यात सक्रिय होत्या. त्यांनी स्त्री आधार केंद्र व क्रांतिकारी महिला संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या त्या अध्यक्षा असून पुण्यात त्यांचं कार्यालय आहे. अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.