Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती! मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

Shinde-Fadnavis Govt : शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदार बाहेर पडले. गुवाहाटीतून नाट्यमयरित्या (Shinde Govt Anniversary) सत्तेत आलेल्या या सरकारची आज वर्षपूर्ती. या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनाही वेग आला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 30, 2023, 07:59 AM IST
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती! मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?  title=
Maharashtra Politics Shinde Fadnavis Government first Anniversary 30 june cabinet expansion on July political news

Maharashtra Cabinet Expansion Latest News : गेल्या वर्षीच्या जून महिन्यांचा शेवटच्या आठवडा महाराष्ट्र राजकारणातील सर्वात घडामोडीचा ठरला होता. महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाचा पक्षात मोठी फूट पडली. शिवसेनेचा एकनिष्ठ म्हणून जो चेहरा पाहिला जायचा त्या एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार बाहेर पडली. गुवाहाटी त्या हॉटेलमधून राज्यातील नव्या सरकारचा उदय झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. 30 जून म्हणजे आज शिंदे फडणवीस सरकरची वर्षपूर्ती.(Shinde Fadnavis Government first Anniversary)

एक वर्षात अनेक चढ उतार पाहता या सरकारने अखेर एक वर्ष पूर्ण केलं. पण या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. पण आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याचं बोलं जातं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी तातडीचा नवी दिल्लीला दौरा केल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.  (Maharashtra Politics Shinde Fadnavis Government first Anniversary 30 june cabinet expansion on July political news)

गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा करून दोन्ही नेते गुरुवारी रात्री उशिरा मुंबईत परतलेत. शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष आज पूर्ण झालंय. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा सवाल विचारला जात आहे. फडणवीसांनी गुरुवारी राज्यपालांशीही चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या भेटीदरम्यान मंत्र्यांच्या शपथविधीसंदर्भात चर्चा झाल्याची सू्त्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील पंढपूरवरुन थेट दिल्ली गेले होते. 

कधी होणार विस्तार?

जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे या केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे, असं बोलं जातं आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त असण्याची शक्यता आहे.